भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घ्यावा

                        अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना मॅट्रिककोत्तर शिक्षण घेता यावे यासाठी भोजन,निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना  स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधित अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरित करण्यासाठी शासनाने  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केली आहे.
            या योजनेसाठी विद्यार्थ्यांना 10 वी/ 12 वी/ पदवी/ पदवीका परीक्षेमध्ये 60 टक्के पेक्षा जास्त गुण असणे अनिर्वाय आहे अनुसूचित जाती व नवबौध्द प्रर्वगातील दिव्यांग  विद्यार्थ्यांसाठी  ही मर्यादा 50 टक्के आहे.
             या योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर(इयत्ता 11वी,पदवी,पदव्यत्तुर पदवी)  शिक्षण घेण्यासाठी शासकीय वसतिगृहात प्रवेशित नसणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी पुढीलप्रमाणे रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये वितरीत करण्यात येईल.
            मुंबई शहर,मुंबई उपनगर,नवी मुंबई,ठाणे,पुणे,निंपरीचिंचवड,नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम पुढीलप्रमाणे भोजन भत्ता रूपये 32 हजार,निवास भत्ता रुपये 2 हजार, निर्वाह भत्ता रूपये 8 हजार, एकूण रूपये 60 हजार,इतर महसूल विभाग शहरातील व उर्वरित/ क/ वर्ग महानगरपालिका क्षेत्रातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम पुढीलप्रमाणे  भोजन भत्ता रुपये 28 हजार, निवास भत्ता रुपये 15 हजार, निर्वाह भत्ता रुपये 8 हजार, एकूण रुपये 51 हजार,उर्वरित ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम पुढीलप्रमाणे  भोजन भत्ता 25 हजार रुपये,निवास भत्ता रुपये 12 हजार, निर्वाह भत्ता रुपये 6 हजार,असे एकूण रुपये 43 हजार,वरील रक्कमेव्यतिरिक्त वैद्यकिय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यासाठी प्रतिवर्ष रुपये 5 हजार व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष रुपये 2 हजार इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी देण्यात  येईल.

            या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा विहीत नमुना http://mahaeschol.maharashtra.gov.in  http://sjsa.maharashtra.gov.in  http://www.maharashtra.gov.in   या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या संकेतस्थळावरुन  डाउनलोड करुन घ्यावा आणि अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या यादीसह तो विद्यार्थ्यांचे जातीचे प्रमाणपत्र ज्या जिल्हयातून काढलेले आहे, त्या जिल्हयाच्या  सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयामध्ये समक्ष,टपालाद्वारे,कार्यालयाच्या ई-मेल वर दि.16 मार्च 2017 पर्यंत दाखल करावा. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.

1 comment:

Powered by Blogger.