भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणे
(60 % पेक्षा जास्त गुण प्राप्त असलेल्या विद्यार्थ्यांसाठीच)
दिनांक : -
23.2.2017
विषय
:- शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या अनुसुचित जाती व नवबौध्द
प्रवर्गातील
विद्यार्थ्याना भोजन, निवास व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन घेणेसाठी
रोख
रक्कम त्यांच्या आधार संलग्न खात्यात जमा करणेबाबत....
संदर्भ :- शासन निर्णय क्र.बीसीएच-2016/प्र.क्र.
293/शिक्षण - 2 दि. 6.1.2017
वरील
विषयाच्या अनुरोधाने सदर परिपत्रकाव्दारे आपणांस कळविण्यात येते की, अनुसुचित जाती
व नवबौध्द प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्याना शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेला
नाही, अशा विद्यार्थ्याना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर
शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्याना स्वत : उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक ती रक्कम
सबंधित विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बॅक खात्यामध्ये थेट उपलब्ध करण्यासाठी
शासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केलेली आहे. या येाजनेची अंमलबजावणी करण्यासाठी संदर्भाकीत शासन
निर्णयाचे काळजीपूर्वक अवलोकन करावे तसेच याबाबत खालील सुचनांने सुध्दा पालन
करावे.
1. संदर्भात
शासन निर्णयामधील सर्व सुचनांने काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.
2. सन 2016-17 या
वर्षामध्ये इ. 11 वी चे विद्यार्थी इ. 12 वी नंतर प्रथम वर्षात प्रवेश घेणारे
पदविका पदवीचे विद्यार्थी आणि प्रथम वर्षात प्रवेश घेणा-या पदव्यत्तर पदवी /
पदवीकाचे विद्यार्थ्याना हा लाभ दिला जाणार आहे. तसेच सन 2017-18 पासून पुढे हा
लाभ 11 वी व 12 वी चे विद्यार्थी आणि 12 वी नंतर प्रथम वर्ष पदविका, पदवी व
पदव्युत्तर पदवीका व पदवीच्या विद्यार्थ्याना सुध्दा हा लाभ दिला जाणार आहे.
3. सोबत जोडपत्र
8 प्रमाणे प्रत्येक जिल्हामध्ये
सन 2016-17 मध्ये किती विद्यार्थी या
लाभासाठी पात्र होतील त्याचा इष्टांक दिलेला आहे.
4. आपल्या
जिल्हयास दिलेल्यालक्षापैकी (Target ) पैकी सन 2016-17 या वर्षामध्ये खालील प्रमाणे
विद्यार्थ्याची गुणवत्तेनुसार निवड करावी.
11 वी चे विद्यार्थी - 40 %
12 वी नंतर
व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रथम वर्षी प्रवेश - 30 %
घेतलेले विद्यार्थी
12 वी नंतर बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रथम वर्षी प्रवेश
घेतलेले - 30 %
विद्यार्थ्यासाठी
5. शासन निर्णयातील
तरतुदीप्रमाणे या योजनामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यासाठी 3 % आरक्षण
असेल व त्यांच्या पात्रतेची किमान टक्केवारी 50 टक्के राहील हा दिव्यांग
विद्यार्थी अनु.जाती व नवबौध्द प्रवर्गातील असावा.
6. दिव्यांग विद्यार्थी वगळता इतर
विद्यार्थ्यासाठी किमान 60 % इ. 10 वी / 12 वी
मध्ये गुण असणे आवश्यक आहे.
7.
विद्यार्थ्याच्या पालकांचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त नसावे.
8. विद्यार्थी
महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
9. या येाजनेचा
लाभ मिळणेसाठी विद्यार्थ्याने स्वत : च्या नावाचा बॅक खाते उघडणे व आपल्या आधार
क्रमांकाशी संलग्न करणे अनिवार्य आहे.
10. स्थानिक
विद्यार्थ्यास हा लाभ दिला जाणार नाही. म्हणजेच विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली
शैक्षणिक
संस्था हि ज्या गाव / शहर /
मेट्रो सिटी च्या परिघामध्ये असेल अशा विद्यार्थ्याना हा लाभ अनुज्ञेय राहणार
नाही.
11. शासन
निर्णयातील तरतुदी प्रमाणे विद्यार्थी इ. 10 वी किंवा 12 वी नंतरचे
अभ्यासक्रमामध्ये प्रवेशित
असावा व त्यास कोणत्याही शासकीय
वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेला नसावा.
12. इ.
11 वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास इ. 10 वी मध्ये किमान 60 % गुण असणे अनिवार्य
असेल, त्यापेक्षा कमी गुण
असणारा विद्यार्थी या लाभास पात्र होणार नाही.
13. पदवी
/ पदव्युत्तर शिक्षणा करीता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास इ. 12 वी मध्ये किमान
60 % गुण
असणे अनिवार्य असेल, त्यापेक्षा कमी गुण असणारा विद्यार्थी या लाभास
पात्र होणार नाही.
14. 12 वी नंतर प्रवेश
घेतलेला पदवी / पदवीका अभ्यासक्रम हा दोन वर्षापेक्षा कमी कालावधीचा नसावा. तसेच पदवी नंतर
पदव्युत्तर पदवी / पदवीका अभ्यासक्रम सुध्दा दोन वर्षापेक्षा कमी कालावधीचा नसावा.
15. शासकीय
वसतिगृहामधील प्रचलित नियमाप्रमाणे इ. 10 वी / 12 वी / पदवी नंतरच्या
अभ्यासक्रमासाठी केवळ प्रथम वर्षात प्रवेश घेतलेला विद्यार्थीच या योजनेचा लाभास
अनुज्ञेय आहे.
16. विद्यार्थ्याची
निवड झाल्यानंतर त्याला प्रत्येक वर्षी 60 % पेक्षा जास्त गुण घेणे अनिवार्य आहे. जर त्यास
पुढील परिक्षेत 60 % पेक्षा कमी गुण मिळाले तर तो या
लाभासाठी पात्र ठरणार नाही.
17. विद्यार्थ्याने
प्रवेश घेतलेले महाविद्यालय आणि प्रवेश घेतलेला अभ्यासक्रम हा राज्य शासन, आखील
भारतीय तंत्रशिक्षण परिषद, भारतीय वैद्यकीय शिक्षण परिषद, वैद्यकीय परिषद,
भारतातील फार्मसी परिषद, वास्तूकला परिषद, कृषी परिषद, महाराष्ट्र तंत्र शिक्षण
परिषद वा तत्सम सक्षम प्राधीकारी यांचेमार्फत
मान्यता प्राप्त असणे बंधनकारक आहे.
18. निवड झालेल्या
विद्यार्थ्याने प्रती वर्षी 60% पेक्षा जास्त गुण प्राप्त केले तरच तो संबंधित अभ्यासक्रम
पुर्ण होईपर्यत या लाभास पात्र राहील.
याचाच अर्थ शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्याने प्रत्येक
अभ्यासक्रम संपल्यानंतर पुढील अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षी पुन्हा अर्ज करुन
प्रवेश घेणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे या योजनेसाठी सुध्दा एक अभ्यासक्रम टप्पा
पुर्ण करुन नवीन अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यास
नविन अर्ज भरणे आवश्यक आहे.
19. या येाजनेचा
लाभ विद्यार्थ्यास एकूण शैक्षणिक कालावधीत जास्तीत जास्त सात वर्षेच घेता येईल.
त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी हि येाजना अनूज्ञेय होणार नाही.
विद्यार्थ्याची निवड -
1. विद्यार्थ्याने
विहीत कालावधीत विहीत नमून्यातील अर्ज भरणे बंधनकारक आहे. सध्या सदरचा अर्ज https://mahaeschol.maharashtra.gov.in,
https://sjsa.maharashtra.gov.in आणि https://Maharashtra.gov.in
या संकेत स्थळावरुन download करुन किंवा सर्व
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयातून विद्यार्थ्यास उपलब्ध होईल.
2. विद्यार्थी
अनु.जाती व नवबौध्द प्रवर्गातील असावा.
3. विद्यार्थ्याने
अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडावीत याची माहिती सोबतच्या जोडपत्र 2 प्रमाणे
आहे. सदरची यादी ही चेक लिस्ट म्हणून प्रत्येक प्राप्त अर्जावर नोटशिट म्हणून
लावावी व पूर्ण कागदपत्रे असलेल्या विद्यार्थ्याचेच अर्ज विचारात घ्यावेत. अपूर्ण
माहितीचे अर्ज विचारात घेवू नयेत.
4. परिपूर्ण
भरलेले व सर्व कागदपत्राच्या प्रति जोडलेले अर्ज ऑफलाईन पध्दतीने स्वीकारावेत.
5. सन 2016-17 या
वर्षी केवळ 11 वी मध्ये प्रवेश घेतलेला
विद्यार्थी आणि पदवी, पदवीका व पदव्युत्तर पदवीसाठी प्रथम वर्षासाठी प्रवेश
घेतलेला विद्यार्थीच अर्ज करण्यास पात्र असेल.
5. आपल्या
जिल्हासाठी दिलेल्या लक्षाच्या ( Target ) / इष्टांकाच्या मर्यादेतच
विद्यार्थ्याची निवड करावयाची आहे.
6. प्राप्त
अर्जामधून अनु.जाती व नवबौध्दामधील दिव्यांग विद्यार्थ्याचे अर्जाची वेगळी
गुणवत्ता यादी करावी व जिल्हा लक्ष / इष्टांकाच्या 3 % विद्यार्थ्याची
गुणवत्तेनुसार करावी. या विद्यार्थ्याची प्रवेश पात्रतेची किमान टक्केवारी 50 %
असेल.
7. दिव्यांग
विद्यार्थ्या व्यतिरीक्त इतर विद्यार्थ्याची गुणवत्तेनुसार दुसरी यादी तयार करावी
व जिल्हा लक्ष / इष्टांकामधील विद्यार्थ्याची गुणवत्तेनुसार निवड यादी तयार करावी
( उदा. जिल्हयाचा इष्टांक 100 असेल तर 3
दिव्यांग विद्यार्थी व 97 इतर विद्यार्थ्याची निवड केली जातील. )
8. विद्यार्थ्याची
निवड यादी कार्यालयाच्या दर्शनीभागी लावून निवड झालेल्या विद्यार्थ्यास कळविण्यात
यावे. सदर यादी विभागाच्या ई-स्कॉलरशिप पोर्टल व एसजेएसए पोर्टलवर प्रसिध्द
करण्यासाठी आयुक्तालयातील शिक्षण शाखेस swadhar.swho@gmail.com या ई-मेल आयडी वर
पाठवावी.
9. गुणवत्तेमध्ये
कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यात येवू नये.
10. विद्यार्थ्याचा
अर्ज प्रत्यक्ष / पोस्टाने / ई-मेल मार्फत
स्विकारण्यात यावेत.
11. विहीत
मुदतीत प्राप्त झालेलेच अर्ज विचारात घेणेत यावेत.
12. सोबत जोडलेल्या
जाहिरातीच्या विहीत नमुन्याप्रमाणे आपल्या
जिल्हयातील जास्तीत जास्त खपाच्या दोन दैनिकांमध्ये जाहीरात प्रसिध्द करण्यात
यावी.
13. सोबत
जोडलेल्या वेळापत्रकाप्रमाणे कार्यवाही करावी.
14. विद्यार्थ्याचे
जातीचे प्रमाणपत्र ज्या जिल्हयातील आहे असेच विद्यार्थी संबंधित सहाय्यक आयुक्त
समाज कल्याण यांचेकडे अर्ज करतील. ( उदा. औसा तालुक्यातील विद्यार्थ्याचे जातीचे
प्रमाणपत्र हे लातूर जिल्हयातील असल्याने हा विद्यार्थी सहाय्यक आयुक्त समाज
कल्याण लातूर यांचेकडेच या येाजनेसाठी अर्ज करेल तो महाराष्ट्रात कुठेही शिकत असेल
तरी त्याचा " विद्यार्थी जिल्हा " हा लातूर असेल आणि
त्याचा " कॉलेज जिल्हा " हा त्याने जर औरंगाबाद जिल्हयामध्ये प्रवेश घेतला असेल तर औरंगाबाद असेल.
)
15. " विद्यार्थी
जिल्हा"- विद्यार्थ्याचे जात प्रमाणपत्र ज्या जिल्हयातील आहे तो जिल्हा "
विद्यार्थी जिल्हा"
असेल. या जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त यांनी
विद्यार्थ्याचे अर्ज स्विकारुन निवड यादी तयार करणे, प्रसिध्द करणे " कॉलेज जिल्हा" कार्यालयास निवड यादी
पाठवून "कॉलेज जिल्हा" कार्यालयाकडून निवड झालेल्या विद्यार्थ्याची माहिती प्राप्त करणे, त्यास
स्वाधार योजने अंतर्गत अनूदान मंजूर करणे व ते विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बॅक
खात्यात जमा करणे ही जबाबदारी असेल.
16. " कॉलेज जिल्हा " - विद्यार्थी ज्या जिल्हयातील
महाविद्यालयामध्ये प्रवेशित आहे तो जिल्हा म्हणजे कॉलेज जिल्हा.या जिल्हयानी निवड
झालेला विद्यार्थी ज्या महाविद्यालयात आहे. त्या महाविद्यालयाच्या नजिकच्या शासकीय
वसतीगृहाशी त्यास संलग्न करुन तसे विद्यार्थ्यास आणि " विद्यार्थी जिल्हा "कार्यालयास कळविणे.
17. "
विद्यार्थी जिल्हा " कार्यालयाने निवड केलेल्या विद्यार्थ्याचे
अनुदान, "कॉलेज जिल्हयातील "वसतिगृह अधिक्षक ( यांना यापुढे "
समन्वय अधिक्षक" असे
संबोधण्यात येईल ) यांनी,
विद्यार्थ्याच्या तिमाही उपस्थितीती अहवाल सादर केल्यानंतर, संबंधित
विद्यार्थ्याचे आधार संलग्न बॅक खात्यामध्ये " विद्यार्थी
जिल्हा कार्यालयाने" जमा करावयाचे आहे व
तसे संबंधित विद्यार्थ्याना एसएमएस / ईमेल
व्दारे कळविणे आवश्यक आहे.
"समन्वय अधिक्षक" :- विद्यार्थ्याने ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतलेला आहे त्या
महाविद्यालयाचे सर्वात नजिकच्या वसतिगृहाचा अधिक्षक म्हणजे "समन्वय अधिक्षक" होय. या वसतिगृह
अधिक्षकाकडे सदर विद्यार्थी संलग्न केला जाईल. संलग्न केलेल्या विद्यार्थ्याची
उपस्थिती व त्याचा तिमाहि अहवाल विद्यार्थ्याकडून / शैक्षणिक संस्थेकडून प्राप्त
करुन घेवून तो " समन्वय अधिक्षक
" यांनी " विद्यार्थी जिल्हा"कार्यालयाकडे प्रत्येक तिमाहीस सादर करावा. एका " समन्वय अधिक्षक " यांचेकडे एका पेक्षा जास्त "
विद्यार्थी जिल्हयातील" विद्यार्थी असू शकतील. म्हणून त्यांनी संबंधित सर्व "विद्यार्थी जिल्हा" कार्यालयाच्या
संपर्कात रहावे.
18) विद्यार्थ्याची
तिमाहीची किमान उपस्थिती 75 % असणे आवश्यक राहील. ज्या तिमाहिमध्ये ही उपस्थिती 75 %
पेक्षा कमी असेल त्या तिमाहीचे अनुदान विद्यार्थ्यास अनुज्ञेय असणार
नाही.
19) विद्यार्थ्यास
कोणत्या शहरासाठी किती अनुदान अनुज्ञेय आहे याची माहिती शासन निर्णयामध्ये नमुद
केलेली आहे. सदर योजनेसाठी कोणत्या लेखाशिर्ष मधून खर्च करावयाचा आहे, त्यासाठी
तरतुद केव्हा उपलब्ध होणार याबाबतची माहिती लवकरच आपणांस कळविण्यात येईल.
तोपर्यत सोबत जोडलेल्या
वेळापत्रकाप्रमाणे जाहिरात देणे, अर्जाची छाननी करणे, गुणवत्ता यादी जाहिर करणे,
निवड यादी जाहिर करणे,"कॉलेज जिल्हा" आणि "समन्वय अधिक्षक "यांची माहिती विद्यार्थ्याना कळविणे, लाभार्थी विद्यार्थ्यास
"कॉलेज जिल्हयातील" वसतिगृहात संलग्न करण्यासाठी संबंधित "कॉलेज
जिल्हयाचे" सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांना
कळविणे, "कॉलेज जिल्हयानी" विद्यार्थी ज्या
महाविद्यालयात शिकतो याबाबतची माहिती प्राप्त झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यास
त्याच्या महाविद्यालयाच्या नजिकच्या वसतिगृहाशी संलग्न करणे व तसे विद्यार्थ्यास
कळविणे, "समन्वय अधिक्षकांनी" विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयामध्ये जावून त्याची माहिती
गोळा करणे व ती "विद्यार्थी जिल्हयाच्या" सहाय्यक आयुक्त यांच्याकडे पाठविणे ही कामे पुर्ण करुन घ्यावीत.
सोबत सदर परिपत्रकासोबत खालील जोडपत्रे पाठविण्यात येत आहेत,
त्याचे काळजीपूर्वक अवलोकन करावे.
i) जाहिरातीचा नमुना (जोडपत्र
- 10)
ii) विद्यार्थ्याने भरावयाच्या अर्जाचा नमुना(जोडपत्र - 9)
iii) विद्यार्थ्याने शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतलेला आहे त्या शैक्षणिक
संस्थेने कोणत्या प्रपत्रात माहिती भरुन द्यावयाची आहे ते प्रपत्र.(जोडपत्र -
1)
iv) योजनेचे निकष व अटी(जोडपत्र - 3)
v) विद्यार्थ्याने RTGS साठी भरुन द्यावयाच्या बॅक
खात्याच्या माहितीचा नमूना.(जोडपत्र - 4)
vi) या येाजनेसाठी स्वतंत्रपणे निर्माण करण्यात आलेल्या जिल्हा निहाय ई-मेल
आयडी व पासवर्ड.(जोडपत्र - 5)
vii) जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त कार्यालयाचा दुरध्वनी, पत्ता, सहाय्यक आयुक्त
समाज कल्याण यांचे नाव त्यांचे दुरध्वनी व
भ्रमणध्वनी (जोडपत्र - 6)
viii) योजनेचे वेळापत्रक(जोडपत्र - 7)
xv) जिल्हानिहाय या योजनेसाठी सन 2016-17 या वर्षी निवड करणे करीता विद्यार्थ्याचा इष्टांक /
लक्ष्ा( Target ), इ. 11 वी चे किती विद्यार्थी निवडावयाचे,
इ. 12 वी नंतरचे किती व्यावसायिक व बिगर व्यावसायिक विद्यार्थी निवडावयाचे
याचा इष्टांक / लक्ष ( Target )(जोडपत्र
- 8)
20. वरील प्रमाणे काटेकोरपणे सदर योजनेची
अंमलबजावणी करावी व कोणत्याही प्रकारच्या तक्रारी होवू नये याची काळजी घ्यावी.
आपल्या कार्यालयातील एक जबाबदार कर्मचारी तसेच बाहयस्त्रोताव्दारे नेमलेला एक कर्मचारी यांना या योजनेची कार्यवाही
करणेसाठी लेखी ओदश काढून जबाबदारी देण्यात यावी.
21. निवड झालेल्या विद्यार्थ्याची वर्षनिहाय स्वतंत्र नोंद वहीमध्ये नोंदणी करावी. या नोंद वही मध्ये
विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव, पत्ता, भ्रमनध्वनी, पालकांचा दुरध्वनी / भ्रमणध्वनी,
महाविद्यालयाचा संपर्क क्रमांक, "कॉलेज जिल्हयाचे" व, "समन्वय अधिक्षक" यांचे नाव, पत्ता व दुरध्वनी क्रमांक, विद्यार्थ्याचा तिमाही अहवाल व
उपस्थिती आणि विद्यार्थ्याचा बॅक खाते क्रमांक व बॅकेचा पत्ता, IFSC क्रमांक, विद्यार्थ्याचा आधार क्रमांक इ. माहितीचा समावेश असावा. या
संबंधातील सोबत जोडलेली सर्व माहिती व शासन निर्णय यांचे काळजीपुर्वक वाचन करावे
आणि आपल्या जिल्हयातील सर्व वसतिगृह अधिक्षक यांची बैठक घेवून त्यांना याबाबी
समजावून सांगाव्यात. प्रत्येक वसतिगृह अधिक्षक यांनी आपले नजिकच्या शाळा /
महाविद्यालयाची माहिती आपल्या जवळ तयार ठेवावी.
22. विद्यार्थ्याकडून जोडपत्रात नमुद
केल्याप्रमाणे सर्व कागदपत्रे आवश्यक ते सर्व शपथपत्र स्थानिक रहीवासी
नसल्याबाबतचे शपथपत्र प्राप्त करुन घेणे बंधनकारक आहे.
23. या योजनेअंतर्गत लाभास पात्र असलेल्या
विद्यार्थ्यास "भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत
निर्वाह भत्ता" अनुज्ञेय राहणार नाही. निवड झालेल्या
विद्यार्थ्याची यादी "कॉलेज जिल्हयास" तात्काळ पाठविण्याची व्यवस्था करावी. "व्यावसायिक
पाठयक्रमाशी संलग्न निर्वाह भत्ता" या येाजनेचा
लाभ घेणा-या विद्यार्थ्याना ही योजना अनुज्ञेय होणार नाही. विद्यार्थ्यास स्वाधार
योजना किंवा व्यावसायिक पाठयक्रमाशी संलग्न योजना यापैकी एक पर्याय निवडावा लागेल.
तसेच सध्या वसतिगृहात प्रवेशित असणा-या विद्यार्थ्याना या योजनेसाठी अर्ज करता
येणार नाही. पूढील वर्षीपासून ( 2017-18 ) विद्यार्थ्यास शासकीय वसतीगृह प्रवेश
किंवा स्वाधार योजना यापैकी एक पर्याय द्यावा लागेल. "कॉलेज जिल्हा" कार्यालयाने या
योजनेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्याची नावे व्यावसायिक पाठयक्रम निर्वाह भत्ता
या येाजनेमधून वगळावीत.तसेच त्यांना निर्वाह भत्ता देवू नये. निवड झालेल्या विद्यार्थ्याचा त्रैमासिक भत्ता
/ अनुदान हे "समन्वय अधिक्षका" कडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोन आठवडयाच्या आत संबंधित
विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बॅक खात्यावर जमा करण्याची जबाबदारी ही "विद्यार्थी जिल्हा" कार्यालयाची असेल.
जोडपत्र क्रमांक 1
डॉ.बाबासाहेब
आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्जासाठी शैक्षणिक संस्थेने द्यावयाची माहिती
अ) 1) विद्यार्थ्याचे नाव
|
|
2)
विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेल्या शैक्षणिक संस्थेचे नांव व पुर्ण पत्ता
|
|
3)
महाविद्यालय कोणत्या विद्यापीठाशी संलग्न आहे
|
|
4)
अर्जदाराने आपल्या महाविद्यालयात कोणत्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेला आहे त्या
अभ्यासक्रमाचे नाव व त्याचा कालावधी
|
|
5)
महाविद्यालयास सक्षम प्राधिकाऱ्याने मान्यता दिलेल्या आदेशाचा क्रमांक व दिनांक
|
|
6)
महाविद्यालयाचा पत्ता
|
|
7)
महाविद्यालय व्यवस्थापन प्रकार
(शासकीय/शासन
अनुदानित/खाजगी अनुदानित/खाजगी विनाअनुदानित/ स्वयंअर्थसहाय्यीत/ अभिमत इत्यादी
नोंद करावी)
|
|
8)
महाविद्यालयाचा ई-स्कॉलरशिपचा यूजर आय.डी. क्रमांक
|
|
9)
विद्यार्थ्याचा प्रवेश नोंदणी क्रमांक / जनरल रजिस्टर नोंदणी क्रमांक
|
|
ब)
विद्यार्थ्याच्या प्रवेशाबाबतची माहिती :-
|
|
(1) अभ्यासक्रमाचे नाव
|
|
(2) प्रवेशित वर्ष
|
(पहिले/
दुसरे/ तिसरे)
|
(3) प्रवेश दिनांक व वर्ष
|
|
(4) अभ्यासक्रमाचा कालावधी
(किती वर्षाचा अभ्यासक्रम)
|
|
(5) व्यवसायिक/ बिगर व्यवसायिक/
उच्च माध्यमिक
|
|
(6) प्रकार- (अनुदानित/
विनाअनुदानित)
|
|
(7) अभ्यासक्रम- (पदवी/पदविका/
पदव्युत्तर) (इतर असल्यासनोंद
करावी)
|
|
(8)
आपल्या महाविद्यालयात प्रवेश घेताना अर्जदाराने सादर केलेल्या गुणपत्रिकेनुसार
त्यास इयत्ता १० वी / १२ वी/ पदवी परिक्षेत मिळालेले एकूण गुण व टक्केवारी
|
इयत्ता १० वी चे गुण
................ टक्केवारी ..........
इयत्ता 12 वी चे गुण
................. टक्केवारी .........
पदवीचे गुण
........................... टक्केवारी .........
|
(9)
अर्जदाराने आपल्या महाविद्यालयामार्फत आणखी कोणत्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर केला आहे.
|
|
(10)
अर्जदाराने आपल्या संस्थेत प्रवेश घेण्यापूर्वी कोणत्या शैक्षणिक संस्थेत शिक्षण
घेतले होते त्याची माहिती
|
|
(11)
अर्जदाराने कोणत्या कोट्यातून प्रवेश घेतला. ((मॅनेजमेंट
कोटा, CAP,
स्पॉन्सर्ड कोटा, मायनॉरीटी, FWS (Fee Waiver
Scheme), इतर (नमूद करणे))
|
स्थळ:
..............................
दिनांक :
........................... शिक्का
मुख्याध्यापक/ प्राचार्य यांची
स्वाक्षरी
जोडपत्र क्रमांक 2
डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्जासाठीसोबत खालील
प्रमाणपत्रांच्या साक्षांकीत प्रती जोडाव्यात ( मुळ प्रमाणपत्र जोडू नये )
1) जातीचा दाखला
|
होय / नाही
|
2)
महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा ( वय /अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र
/ रेशन कार्ड / निवडणूक ओळखपत्र /जन्म तारखेचा दाखला / शाळा सोडल्याचा दाखला
यापैकी एक )
|
होय / नाही
|
3) आधार कार्डाची प्रत
|
होय / नाही
|
4)
बॅकेत खाते उघडल्याचा पुरावा म्हणून पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत किंवा बॅक
स्टेटमेंटची प्रत किंवा रद्द केलेला चेक.
|
होय / नाही
|
5) तहसिलदार पेक्षा
कमी दर्जा नसलेल्या महसूल अधिकारी यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र किंवा वडील
नौकरीत असल्यास फॉर्म नंबर16
|
होय / नाही
|
6) विद्यार्थी
दिव्यांग असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र
|
होय / नाही
|
7) इ. 10 वी, 12 वी
किंवा पदवी परिक्षेचे गुणपत्रक
|
होय / नाही
|
8) महाविद्यालयाचे
बोनाफाईड सर्टिफिकेट
|
होय / नाही
|
9) विद्यार्थीनी
विवाहीत असल्यास पतीच्या उत्पन्नाचा पुरावा
|
होय / नाही
|
10) बॅक खाते आधार
क्रमांकाशी संलग्न केल्याबाबतचा पुरावा
|
होय / नाही
|
11) विद्यार्थ्याने
कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र
|
होय / नाही
|
12) स्थानिक रहिवासी
नसल्याबाबतचे प्रमाणपत्र
|
होय / नाही
|
13)
विद्यार्थी सध्या जेथे राहतो त्याबाबतचा पुरावा ( खाजगी वसतिगृह, भाडे करारनामा
इ. )
|
होय / नाही
|
14) महाविद्यालयाचे
उपस्थिती प्रमाणपत्र
|
होय / नाही
|
15) सत्र परिक्षेच्या
निकालाची प्रत
|
होय / नाही
|
अर्जदाराची स्वाक्षरी
व पुर्ण नाव
.............................................
जोडपत्र क्र. 3
योजनेचे निकष, अटी व शर्ती पुढीलप्रमाणे
सदर
योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील प्रमाणे निकष असतील
सन 2016-17 करिता सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विदयार्थी संबंधित सहाय्यक
आयुक्त, समाजकल्याण यांच्याकडे अर्ज सादर करतील. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण हे अर्जाची
छानणी करतील व त्यांची गुणवत्ता यादी जिल्हानिहाय तयार करुन पात्र लाभार्थ्यांना त्याने घेतलेल्या प्रवेशाचे
जिल्हयातील जवळचे मागासवर्गीय मुला/मुलींचे वसतिगृहांशी संलग्न (attach) करतील. सामाजिक न्याय विभागाने ठरवून दिलेल्या पध्दतीने
या योजने साठी अर्ज करावा लागेल.
विद्यार्थ्यांची
निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे असेल:
·
सदर
योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थी अनुसुचित जाती व नवबौध्द या प्रवर्गाचा असावा.
·
त्याने
जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक असेल.
·
विद्यार्थी
महाराष्ट्राचा रहीवासी असावा.
·
विद्यार्थ्यांने
स्वत:चा आधार क्रमांक त्याने ज्या राष्ट्रीयकृत/ शेड्युल्ड बँकेत खाते उघडले आहे
त्या खात्याशी संलग्न करणे बंधनकारक असेल.
·
विद्यार्थ्याच्या
पालकाचे उत्पन्न रु. 2,50,000/- (अक्षरी रूपये दोन लाख पन्नास हजार फक्त)पेक्षा जास्त
नसावे.
·
विद्यार्थी
स्थानिक नसावा.(विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या ठिकाणी आहे,
अशा ठिकाणचा सदर विद्यार्थी रहिवासी नसावा)
·
विद्यार्थी
इ. 11वी, 12वी आणि त्यानंतरचेदोन वर्षापेक्षा कमी कालावधी नसलेल्या
अभ्यासक्रमासाठी उच्चशिक्षण घेणारा असावा.
·
इ. 11वी
आणि 12 वी मध्ये प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यास 10वी मध्येकिमान 60% गुण असणे अनिवार्य असेल.
·
इ.12 वी
नंतरच्या दोन वर्षाकरीता जास्त कालावधी असलेल्या पदवीका किंवा पदवी अभ्यासक्रमास
प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास इ. १२ वी मध्ये ६० टक्के पेक्षा जास्त गुण असणे
अनिर्वाय आहे.
·
दोन
वर्षापेक्षा कमी कालावधी नसणा-या कोणत्याही मान्यता प्राप्त अभ्यासक्रमास प्रवेश
घेणाऱ्या विद्यार्थ्यास योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक वर्षी किमान 60% गुणकिंवा त्या प्रमाणात ग्रेडेशन/CGPA
चे गुण असणे आवश्यक राहील.
·
इ.12 वी
नंतर पदवीका, पदवी अभ्यास क्रमासाठी प्रवेश घेणारा अभ्यासक्रम हा दोन वर्षापेक्षा
आणि पदवीनंतर पदव्युत्तर पदवी/ पदवीका अभ्यासक्रमाचा कालवधीहीदोन वर्षापेक्षा कमी
नसावा.
·
विद्यार्थ्याने
राज्यशासन, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, भारतीय वैद्यकिय शिक्षण परिषद/
वैद्यकिय परिषद, भारतातील फार्मसी परिषद, वास्तुकला परिषद, कृषी परिषद, महाराष्ट्र
तंत्रशिक्षण परिषद वा तत्सम सक्षम प्राधीकारी यांच्या मार्फत मान्यता प्राप्त
महाविद्यालया मध्ये व मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असावा.
·
विद्यार्थ्याची
निवड गुणवत्तेनुसार करण्यात येईल. निवडलेला विद्यार्थी संबंधीत अभ्यासक्रम पुर्ण
होईपर्यंत लाभास पात्र राहील.
·
या
योजनेमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 3% आरक्षण असेल, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची किमान टक्केवारीची
मर्यादा 50% इतकी राहील.
·
प्रवेशित
विद्यार्थ्यांस प्रत्येक सत्र परिक्षेचा निकालाची प्रतनिकाल लागल्यापासून 15
दिवसांचे आत नेमून दिलेल्या कार्यालयात सादर करणे बंधनकारक राहिल.
·
सदर
योजनेचा लाभप्रवेशित अभ्यासक्रमांच्या कालावधीपर्यतच देय राहिल. या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना एकुण शैक्षणिक
कालावधीत जास्तीत जास्त 7 वर्षापर्यंत घेता येईल.
·
विद्यार्थ्याने
खोटी माहिती व कागदपत्रे देऊन सदर योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास किंवा
शैक्षणिक अभ्यासक्रम पुर्ण न केल्यास अथवा नोकरी व व्यवसाय करित असल्यास आणि इतर
मार्गाने या योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास तो कारवाईस पात्र
राहील. तसेच त्यास दिलेल्या रकमेची 12
टक्के व्याजासह वसुली केली जाईल.
·
या
योजनेचा लाभ मंजूर झाल्यानंतर विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षी किमान ६० टक्के गुण
मिळविणे अनिवार्य आहे अन्यथा तो या योजनेस अपात्र होईल.
लाभाचे
वितरण:
·
विद्यार्थ्यांचा
प्रवेश ज्या वसतिगृहाशी संलग्न करण्यात आला आहे त्या वसतिगृहाचे गृहप्रमुख/ गृहपाल
विद्यार्थ्यांने घेतलेल्या प्रवेशाच्या ठिकाणी म्हणजे संबंधीत महाविद्यालयाकडुन
उपस्थितीचा अहवाल प्राप्त करुन संबंधीत जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज
कल्याण यांना सादर करतीलव संबंधीत सहाय्यक
आयुक्त समाज कल्याण यांनी सदर योजनेतील पात्र प्रत्येक तिमाही उपस्थितीच्या आधारे
अनुज्ञेय रक्कम त्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये DBT Portal मार्फत जमा करतील.
विद्यार्थ्यांच्या बँक खात्याशी त्यांचा आधार कार्ड क्रमांक संलग्न करण्यात येईल.
·
DBT Portal सुरु होईपर्यत प्रचलित पध्दतीने सदरचा लाभ विद्यार्थ्यांच्या नांवे RTGS पध्दतीने त्याच्या आधार संलग्न
बँक खात्यात जमा करण्यात येईल.
·
विद्यार्थ्यांने
संबधित शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर सदर योजनेंतर्गत अनुज्ञेय होणाऱ्या
रक्कमेपैकी पहिल्यातिमाहीची रक्कम आगाऊ देण्यात येईल.
·
या
योजनेंतर्गत लाभास पात्र असलेल्या विद्यार्थ्यांस भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत
प्राप्त होत असलेल्या निर्वाह भत्याची रक्कम वजावट करुन उर्वरित रक्कम निर्वाह
भत्ता म्हणून अदा करण्यात येईल.
·
जे
विद्यार्थी व्यवसायिक पाठयक्रमाशी संलग्न निर्वाह भत्ता या योजनेचा लाभ घेत असतील
त्यांना या योजनेतील निर्वाह भत्याचा लाभ मिळणार नाही.
·
विद्यार्थ्यांची
महाविद्यालयातील उपस्थिती किमान 75 % असणे आवश्यक राहील, याबाबत संबंधित संस्थेच्या
प्राचार्यांकडून प्रत्येक तिमाही उपस्थितीबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक
राहील.
जोडपत्र क्रमांक
-4
R.T.G.S. साठी विद्यार्थ्यांनी भरुन
द्यावयाच्या प्रमाणपत्राचा नमुना
1.
|
विद्यार्थ्यांचे
नांव
(खाते
पुस्तकानुसार)
|
|
2
|
बँकेचे
नांव
|
|
3
|
शाखेचे
ठिकाण
|
|
4
|
बँक
खाते क्रमांक
|
|
5
|
IFSC CODE
|
|
6
|
MICR CODE
|
|
(सोबत
:- बॅकेच्या खाते पुस्तकाच्या पहिल्या
पानाची झेरॉक्स अथवा रद्द केलेला स्वाक्षांकित धनादेश जोडावा.
|
||
अ.क्र.
|
जिल्हा
|
अधिकारी नाव
|
एस.टी.डी. कोड
|
कार्यालय दूरध्वनी
|
मोबाईल
|
कार्यालय पत्ता
|
१
|
मुंबई शहर
|
श्रीमती एम.एस.शेरे
|
०२२
|
25275073
|
9987314514
|
सहाय्यक आयुक्त
समाज कल्याण,मुंबई शहर प्रशासकीय भवन ४था मजला आर सी चेंबुरकर मार्ग मुंबई.७१
|
२
|
मुंबई उ. नगर
|
अविनाश देवसटवार
|
०२२
|
25222023
|
9421680000
|
सहाय्यक आयुक्त
समाज कल्याण, मुंबई उपनगर प्रशासकीय भवन ४था मजला आर सी चेंबुरकर मार्ग
मुंबई.७१
|
३
|
ठाणे
|
उज्ज्वला सपकाळे
|
०२२
|
25341359
|
9823679997
|
सहाय्यक आयुक्त
समाज कल्याण ठाणे , ५ व मजला जिल्हाधिकारी इमारत, कोर्ट नका ठाणे (प)- ४००६०१
|
४
|
पालघर
|
सहाय्यक आयुक्त
समाज कल्याण, पालघर,
|
||||
५
|
रायगड
|
श्री. खैरनार
|
०२१४१
|
222288
|
८३०८१०२३३८
|
सहाय्यक आयुक्त
समाज कल्याण रायगड,
|
६
|
रत्नागिरी
|
ए.एस.बन्ने
|
०२३५२
|
230957
|
9403584304
|
सहाय्यक आयुक्त समाज
कल्याण रत्नागिरी सामाजिक न्याय भवन कुवारबांब ता. रत्नागिरी-४१५६१२
|
७
|
सिंधुदुर्ग
|
जे.एम.चाचरकर
|
०२३६२
|
228882
|
8975444210
|
सहाय्यक आयुक्त
समाज कल्याण कलेक्टर कॉम्पलेक्स सिंधुदुर्ग नगरी, सिंधुदुर्ग-४१६८१२
|
८
|
नाशिक
|
श्रीमती वंदना कोचुरे
|
०२५३
|
2236059
|
9403516982
|
सहाय्यक आयुक्त
समाज कल्याण नाशिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सामाजिक न्याय भवन नासर्डी पुलाजवळ नाशिक पुणे रोड नाशिक
पिन- ४२२०११
|
९
|
धुळे
|
श्रीमती वैशाली हिंगे
|
०२५६२
|
241812
|
9403428743
|
सहाय्यक आयुक्त
समाज कल्याण धुळे, जुने जिल्हाधीकार्यालय आवार धुळे
|
१०
|
नंदुरबार
|
राकेश महाजन
|
०२५६४
|
210025
|
9028550497
|
सहाय्यक आयुक्त
समाज कल्याण, तलाठी कॉलनी, ०१-ब, धुळे रोड नंदुरबार-४२५४१२
|
११
|
जळगाव
|
श्री राकेश पाटील
|
०२५७
|
2263328
|
८२७५३२१२५८
|
सहाय्यक आयुक्त
समाज कल्याण,जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आकाशवाणी केंद्राजवळ जळगाव
|
१२
|
अहमदनगर
|
माधव वाघ
|
०२४१
|
2329378
|
9881835464
|
सहाय्यक आयुक्त
समाज कल्याण ,अहमदनगर नालेगओन वातरंगे मळा अहमदनगर-४११००१
|
१३
|
पुणे
|
श्री अविनाश शिंदे
|
०२०
|
24456336
|
९१५८४०४९९९
|
सहाय्यक आयुक्त
समाज कल्याण पुणे, पी.एम. टी.
बिल्डींग ,पहिला मजला जानकी सभागृह मागे स्वारगेट पुणे पिन-४११०३७
|
१४
|
सातारा
|
आर.ए.कदमपाटील
|
०२१६२
|
234246
|
९८२२४१८०५६
|
सहाय्यक आयुक्त
समाज कल्याण, सातारा समाज कल्याण संकुल ,४०९/९ बसदरबझार ,सातारा.
|
१५
|
सांगली
|
श्री. आर.एन. देवडे(प्र)
|
०२३३
|
2374739
|
९८२३८३७२४२
|
सहाय्यक आयुक्त
समाज कल्याण,सांगली, जिल्हापरिषद आवार सांगली-४१६४१६
|
१६
|
सोलापूर
|
श्री नागेश चौगुले
|
०२१७
|
2734950
|
८४८३८०४९२०, ७८७५३१८२०१
|
सहाय्यक आयुक्त
समाज कल्याण,सोलापूर सात रस्ताजवळ,सोलापूर
|
१७
|
कोल्हापूर
|
विजयकुमार गायकवाड
|
०२३१
|
2651318
|
9673008060
|
सहाय्यक आयुक्त
समाज कल्याण कोल्हापूर नविनप्रशासकीय इमारत पहिला मजला ब्लॉकन.६ जिल्हा पोलीस
अधिक्षक कार्यालायशेजारी कसबा बावडा, कोल्हापूर
|
१८
|
अमरावती
|
प्राजक्ता डी. इंगळे
|
०७२१
|
2661261
|
९६०४३१६७९७
|
सहाय्यक आयुक्त
समाज कल्याण अमरावती , मोर्शी रोड, पोस्ट ऑफिसजवळ,शिवाजीनगर अमरावती.
|
१९
|
बुलढाणा
|
एम.जी. वाट
|
०७२६२
|
242245
|
9421774442
|
सहाय्यक आयुक्त
समाज कल्याण, बुलढाणा पार्लेवार यांची बिल्डींग वानखेडे लेआऊट वार्ड क्र.२० डॉ.
भराड याच्या दवाखान्यासमोर, बुलढाणा.
|
२०
|
अकोला
|
शरद चव्हाण
|
०७२४
|
2426438
|
9689576458,७०५७१७९७१०
|
सहाय्यक आयुक्त
समाज कल्याण अकोला नविन प्रशासकीय ईमारत अकोला.
|
२१
|
वाशिम
|
एम.जी. वाट
|
०७२५२
|
235399
|
9421774442
|
सहाय्यक आयुक्त
समाज कल्याण वाशिम, प्रशासकीय इमारत दुसरा मजला कक्ष क्र.२१३ वाशिम
|
२२
|
यवतमाळ
|
विजय साळवे
|
०७२३२
|
242035
|
9527446958
|
सहाय्यक आयुक्त
समाज कल्याण यवतमाळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सामाजिक न्याय भवन दक्षता भवनामागे, दारव्हा रोड, यवतमाळ
|
२३
|
नागपूर
|
एम. टी. वानखेडे
|
०७१२
|
2555178
|
9011014820
|
सहाय्यक आयुक्त
समाज कल्याण नागपूर,प्रशासकीय भवन, पहिला मजला ,उद्योग भवनाच्या बाजूला,
सिव्हील लाईन नागपूर
|
२४
|
वर्धा
|
बाबासाहेब देशमुख
|
०७१५२
|
243331
|
9822928105
|
सहाय्यक आयुक्त
समाज कल्याण वर्धा प्रशासकीय भवन, तळमजला जिल्हाधिकारी कार्यालय परिसर ,सिव्हील
लाईन वर्धा.
|
२५
|
भंडारा
|
देवसुदन धारगावे
|
०७१८४
|
252608
|
8806123505
|
सहाय्यक आयुक्त
समाज कल्याण,भंडारा, वाघमारे बिल्डींग राजगोपालचारी वार्ड, भंडारा
|
२६
|
गोंदिया
|
श्री.जाधव (प्र)
|
०७१८२
|
234117
|
९९८७५६५४५५
|
सहाय्यक आयुक्त
समाज गोंदिया,कल्याणडॉ. बाबासाहेब आंबेडकर
सामाजिक न्याय भवन, जिल्हाधीकार्यालाया मागे गोंदिया.
|
२७
|
चंद्रपूर
|
प्रसाद कुलकर्णी
|
०७१७२
|
253198
|
9049996520
|
सहाय्यक आयुक्त
समाज कल्याण चंद्रपूर,प्रशासकीय इमारत ,जिल्हाधिकारी कार्यालय परिसर,
कक्ष.क्र.१९ चंद्रपूर ४४२४०१
|
२८
|
गडचिरोली
|
श्री.विनोद मोहतुरे
|
०७१३२
|
222192
|
९४०५८६४३९०
|
सहाय्यक आयुक्त
समाज कल्याण गडचिरोली , गडचिरोली कॉम्प्लेक्स, गडचिरोली
|
२९
|
औरंगाबाद
|
जलील शेख
|
०२४०
|
2402391
|
9405771771
|
सहाय्यक आयुक्त
समाज कल्याण,औरंगाबाद,शासकीय कला महाविद्यालय
पाठीमागे किल्लेअर्क औरंगाबाद
|
३०
|
जालना
|
श्रीमती संगिता मकरंद
|
०२४८२
|
225172
|
७८७५७५७८४०
|
सहाय्यक आयुक्त समाज
कल्याण, जालना, जिल्हाधिकारी आवार, प्रशासकीय इमारत, औरंगाबाद रिंगरोड , सर्वे
न. ४८८, जालना.
|
३१
|
बीड
|
आर.एम. शिंदे
|
०२४४२
|
222672
|
9403970779
|
सहाय्यक आयुक्त
समाज कल्याण बीड, डॉ.गिरी हॉस्पिटल समोर आदर्शनगर, बीड.
|
३२
|
परभणी
|
श्री.टी.एल. माळवदकर
|
०२४५२
|
220595
|
९४२२२०२६८९
|
सहाय्यक आयुक्त
समाज कल्याण, परभणी, प्रशासकीय इमारत, परभणी.
|
३३
|
लातूर
|
एस.आर.दाने
|
०२३८२
|
258485
|
9730351964
|
सहाय्यक आयुक्त
समाज कल्याण लातूर,प्रशासकीय इमारत दुसरा मजला खोली क्र. २ ,लातूर
|
३४
|
नांदेड
|
श्री. बी.एन.वीर
|
०२४६२
|
285477
|
९८५००४००१०
|
सहाय्यक आयुक्त
समाज कल्याण, नांदेड, राठोड बिल्डींग, टिळकनगर,नांदेड -४३१६०१.
|
३५
|
हिंगोली
|
सी. के. कुलाल
|
०२४५६
|
223702
|
9822763717
|
सहाय्यक आयुक्त
समाज कल्याण, हिंगोली घर क्र. २० नारायणनगर , हिंगोली-४३१५३१
|
३६
|
उस्मानाबाद
|
श्री रवींद्र कदम
|
०२४७२
|
222014
|
९०११०८३५४१
|
सहाय्यक आयुक्त
समाज कल्याण, प्रशासकीय इमारत, रूम न. ५ उस्मानाबाद, जिल्हा उस्मानाबाद .
|
प्रादेशिक
समाज कल्याण अधिकारी पत्ते ,दूरध्वनी
अ.क्र.
|
विभाग
|
अधिकारी नाव
|
एस.टी.डी कोड
|
कार्यालय दूरध्वनी
|
मोबाईल
|
पत्ता
|
१
|
पुणे
|
श्री.एल.बी. महाजन
|
०२०
|
२४४४५९२५
|
९४२३००८४५९
|
प्रादेशिक समाज कल्याण विभाग पुणे,पी.एम. टी. बिल्डींग ,पहिला मजला जानकी
सभागृह मागे स्वारगेट पुणे पिन-४११०३७
|
२
|
मुंबई
|
श्री.वाय. एस. मोरे
|
०२२
|
२७५७६८०५
|
९४२२८०८५०५
|
प्रादेशिक समाज कल्याण विभाग मुंबई
कोकण भवन ६वामजला सी.बी.डी. बेलापूर
नवी मुंबई जिल्हा ठाणे पिन-४००६१४
|
३
|
नाशीक
|
श्री.के. एन. गवळे
|
०२५३
|
२२३६०४८
|
९४२०३९४५०५
|
प्रादेशिक समाज कल्याण विभाग नाशिक .
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक
न्याय भवन नासर्डी पुलाजवळ नाशिक पुणे रोड नाशिक
|
४
|
औरंगाबाद
|
श्री.जितेंद्र वळवी
|
०२४०
|
२३३१५३८
|
८८८८८०८३७२
|
प्रादेशिक समाज कल्याण विभाग
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक
न्याय भवन मोना नाका दुध डेअरी जवळ औरंगाबाद.
|
५
|
अमरावती
|
श्री.दिपक वडकुते
|
०७२१
|
२५५०६८७
|
९९२३६८५७८१
|
प्रादेशिक समाज कल्याण विभाग अमरावती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक
न्याय भवन पोलीस आयुक्तालयाच्या पाठीमागे चांदूर रेल्वे स्टेशन अमरावती.
|
६
|
लातूर
|
श्री.एल. आय. वाघमारे
|
०२३८२
|
२२३३७८
|
९४२३७१९४५१
|
प्रादेशिक समाज कल्याण लातूर,
१ नं.चौक गणेश सुझुकी शोरूम पाठीमागे बार्शी रोड लातूर- ४१३५१२
|
७
|
नागपूर
|
श्री.माधव झोड
|
०७१२
|
२५४६६५९
|
९९२१२५८९६७
|
प्रादेशिक समाज कल्याण विभाग
प्रशासकीय इमारतक्र. २ , ३ मजला सिव्हील लाईन नागपूर पिन -४००००१
|
जोडपत्र - ७
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2016-17
करीता कार्यान्वित करण्याबाबतचे वेळापत्रक
1
|
योजनेची प्रसिध्दी देणे व अर्ज
मागविणे व स्विकृत करणे
|
दिनांक 27 फेब्रुवारी 2017 ते 16
मार्च 2017
|
2
|
संबंधीत
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी अर्जाची छाननी करून गुणवत्ता यादी जाहिर करणे
|
दिनांक 17मार्च 2017 ते 18
मार्च 2017
|
3
|
अर्ज
केलेल्या विद्यार्थ्यापैकी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना SMS/E-mail व्दारे कळविणे
|
दिनांक 19मार्च 2017 ते 21
मार्च 2017
|
4
|
लाभार्थी
विद्यार्थ्यास" कॉलेज
जिल्हयातील" सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहाशी
संलग्न करणे
|
दिनांक 22 मार्च 2017 ते 24
मार्च 2017
|
5
|
विद्यार्थ्यांकडुन
प्राप्त झालेल्या कागदपत्रांची छाननी करुन संबंधीत गृहप्रमुख /गृहपाल यांनी आपला
अहवाल विद्यार्थी जिल्हयाच्या सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांचेकडे पाठविणे
|
दिनांक 25 मार्च 2017 ते 27
मार्च 2017
|
6
|
विद्यार्थ्यांच्या
खात्यात रक्कम जमा करण्यासाठी देयके तयार करुन कोषागारात सादर करणे व पारित करुन
घेणे. विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करणे.
|
दिनांक 28 मार्च 2017 ते 30
मार्च 2017
|
जोडपत्र - 9
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार
योजनासाठी सन 2016-17 वर्षाकरिता अनुसूचित जाती व नवबौध्द
विद्यार्थ्याने करावयाच्या अर्जाचा नमुना
|
अर्ज दाराचा फोटो
|
आवेदनपत्र
भरण्यापुर्वी ते काळजीपुर्वक वाचुन भरावे
कार्यालयाने
भरावयाची माहिती
|
|||
आवेदनपत्र
आवक क्रमांक
|
गुणवत्ता
यादीतील
क्रमांक
|
गुण
|
टक्केवारी
|
एकूण गुण ..................
मिळालेले
गुण ..............
|
|||
प्रति,
सहाय्यक
आयुक्त,
समाज
कल्याण, ...............................
महोदय /
महोदया
मी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर
स्वाधार योजनेचा लाभ मिळणेसाठी माझे आवेदन पत्र सादर करीत आहे. आवदेनपत्रात
नमुद केलेली माहिती माझ्या माहितीनुसार खरी आहे.
मी सदर योजनेच्या सर्व अटी व शर्ती पुर्णपणे वाचलेल्या असून त्या मला अवगत
झाल्या आहेत. या योजनेचा लाभ मिळाल्यास मी
सदर योजनेसाठी लागु असलेल्या नियमांचे /अटींचे कसोशिने पालन करीन अशी मी हमी देत
आहे.
मी खोटी माहिती व कागदपत्रे देऊन लाभ
घेतल्यास किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम पुर्ण न केल्यास अथवा नोकरी व व्यवसाय करीत
असल्यास आणि इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास
मी कारवाईस पात्र राहील. तसेच सदर
योजनेअंतर्गत मला मिळालेली रक्कम (12टक्के) व्याजासह शासनास परत करेन याची मला
जाणीव आहे.
स्थळ :- आपला/आपली
विश्वासू
दिनांक :-
(अर्जदाराची
स्वाक्षरी)
अर्जदाराचे नांव ...............................
मोबाईल क्रमांक ..............................
आधार क्रमांक .................................
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार
योजनाकरिता करावयाच्या अर्जाचा नमुना
अर्जदाराची
माहिती:
|
|||||
अ)
1) अर्जदार विद्यार्थ्याचे संपुर्ण नांव :- आडनाव ..........................स्वत:चे
नांव ........................... वडिलांचे नांव................
|
|||||
2)
वडिलांचे पुर्ण नाव :- आडनाव .................स्वत:चे नांव
................ वडिलांचे नांव................
|
|||||
3)
अर्जदार विद्यार्थीनी विवाहीत असेल तर पतीचे नाव व पत्ता:-
|
|||||
4)
आईचे पुर्ण नाव: -
|
|||||
5)
जात व प्रवर्ग:-
|
|||||
6)
(i) अर्जदाराचे मुळ राहण्याचे ठिकाण व
पत्र व्यवहाराचा पुर्ण पत्ता
(पिनकोडसह)
|
घर
क्रमांक .............. रस्ता/ गल्ली ..............................
जवळची
खूण ................... गाव/शहर .......................
तालुका
..................... जिल्हा .................................
पिन
क्रमांक .................................
|
||||
(ii) उपविभागीय अधिकारी/
उपजिल्हाधिकारी यांनी दिलेला
रहिवासी
दाखला
|
प्रमाणपत्र
क्रमांक ................ दिनांक ..........................
कार्यालयाचे
नाव .....................................................
|
||||
7)
अर्जदाराचा मोबाईल क्रमांक
असल्यास
दूरध्वनी क्रमांक (एसटीडी कोडसह)
|
..........................................
..........................................
|
||||
8)
अर्जदार दिव्यांग आहे काय?
दिव्यांगत्वाचा
प्रकार
टककेवारी
|
.......................................
.......................................
........................................
|
||||
ब)
जातीच्या दाखल्याचा तपशिल :-
|
|||||
(i) अर्जदाराने ज्या जिल्ह्यातून जातीचा
दाखला काढला आहे त्या जिल्ह्याचे
नांव.
(ii)अनु.जाती व नवबौध्द असल्याबाबतचे
उपविभागीय अधिकारी/ उपजिल्हाधिकारी
यांनी दिलेल्या जात प्रमाणपत्रातील
माहिती
|
......................................
प्रमाणपत्र
क्रमांक ............ जारी केल्याचा दिनांक .........
जात
.............................गांव .................................
तालुका
.......................... जिल्हा ............................
|
||||
क)
आधार कार्डाचा तपशिल :-
|
|||||
(i) अर्जदाराचा आधार कार्ड क्रमांक
|
|||||
(ii) आधारकार्डावरील पत्ता
|
|||||
ड)
बँकेचा तपशिल :-
|
|||||
(1) राष्ट्रीयकृत/ शेड्यूल्ड बॅकेचे नांव
|
|||||
(2) शाखा
|
|||||
(3) खाते क्रमांक
|
|||||
(4) I.F.S.C. कोड
|
|||||
(5) बॅक खाते
आधारकार्डाशी संलग्न
केल्याबाबतचा पुरावा
|
|||||
इ)
प्रवेशित महाविद्यालयाची माहिती :-
|
|||||
1) ज्या महाविद्यालयात अर्जदाराने
प्रवेश घेतलेला आहे त्या
महाविद्यालयाचे नांव
|
|||||
2) महाविद्यालयाचा पत्ता
|
|||||
3) महाविद्यालयाने विद्यार्थ्यास
दिलेला
प्रवेश नोंदणी क्रमांक/ सर्वसाधारण
नोंदवहीतील नोंद क्रमांक/ ओळखपत्र
क्रमांक
|
|||||
फ)
प्रवेशित अभ्यासक्रमाची माहिती :-
|
|||||
1) अभ्यासक्रमाचे नाव
|
|||||
2) प्रवेशित वर्ष
|
(पहिले/
दुसरे/ तिसरे/ चौथे/ पाचवे)
|
||||
3) प्रवेश दिनांक व वर्ष
|
|||||
4) अभ्यासक्रमाचा कालावधी
(किती वर्षाचा अभ्यासक्रम)
|
|||||
5) अभ्यासक्रम- पदवी/पदविका/
पदव्युत्तर (इतर असल्यास नोंद
करावे.)
|
|||||
ग)
गुणाची टक्केवारी :-
|
|||||
प्रवेश वर्ष व दिनांक
|
उत्तीर्ण महिना व वर्ष
|
एकूण गुण
|
एकूण पैकी प्राप्त गुण
|
गुणांची टक्केवारी
|
|
इयत्ता
10 वी
|
|||||
इयत्ता
12 वी
|
|||||
पदवी
|
|||||
टिप: 1) गुणांच्या ऐवजी ग्रेडेशन असल्यास ग्रेडेशन नुसार येणारी
टक्केवारी द्यावी.
2) जे लागू नसेल ते खोडावे.
|
|||||
ह)
(i)अर्जदाराने
अनु.जातीच्या विद्यार्थ्यांसाठी
देय असणाऱ्या शिष्यवृत्ती/ शैक्षणिक
परिक्षा
फी योजनेचा लाभ घेतला आहे का?
|
होय
/ नाही
|
||||
(ii)घेतला असल्यास त्याचा यूजर आय.डी.
क्रमांक
|
|||||
अर्जदाराच्या
पालकांची माहिती:
1)
पालकांचे पुर्ण नाव
|
|
2)
पालकाचे अर्जदारांशी असलेले नाते
|
|
3)
वडिल जिवीत नसल्यास त्यांचे मृत्यूचे प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत जोडावी
|
|
4)
पालकांचा व्यवसाय.
|
|
5)
जेथे व्यवसाय करतात तेथील पत्रव्यवहाराचा पत्ता.
|
|
6)
पालकांचे मागील वर्षाचे वार्षिक उत्पन्न.
(तहसिलदार
यांनी दिलेले प्रमाणपत्र किंवा जेथे
सेवा करीत असतील तेथील कार्यालय प्रमुखाने प्रमाणित केलेल्या वार्षिक वेतन
प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत जोडावी.)
|
रुपये
...............................
वर्ष
..................................
|
मी दिलेली माहिती खोटी आढळल्यास किंवा
माझ्या पाल्याने शैक्षणिक अभ्यासक्रम पुर्ण न केल्यास अथवा नोकरी व व्यवसाय करीत
असल्यास आणि इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास
माझ्या पाल्यास सदर योजनेचा मिळत असलेला लाभ रदद होईल, याची तसेच अशा प्रकरणी सदर योजनेअंतर्गत माझ्या पाल्यास मिळालेली
रक्कम 12टक्के व्याजासह मी शासनास परत करीन अशी लेखी हमी देत आहे.
स्थळ: ................................
दिनांक:
..............................
साक्षीदार-
नांव: 1) ..................................
स्वाक्षरी .................
2) .................................. स्वाक्षरी
................. पालकाची स्वाक्षरी
जोडपत्र - 10
|
|
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
अनुसूचित
जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणे
(60 % पेक्षा जास्त गुण प्राप्त असलेल्या विद्यार्थ्यांसाठीच)
दिवसेंदिवस वाढत असलेली व्यावसायिक व बिगर व्यावसायिक महाविद्यालयांची
संख्या आणि तेथे प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या संख्येच्या
प्रमाणात, राज्यात शासकीय वसतीगृहांची
सुविधा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
त्यामुळे पुढील शैक्षणिक प्रवेशास मर्यादा येत आहेत. शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या
विद्यार्थ्यांना तात्काळ वसतीगृह सुरू करून तेथे प्रवेश देण्यावर, जागेची उपलब्धता
व बांधकामासाठी लागणारा कालावधी लक्षात घेता मर्यादा येतात. अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना
मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा या
विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधीत अनुसूचित जाती
व नवबौध्द विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी
शासनाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केलेली आहे. या योजनेसाठी विद्यार्थ्यांना 10वी / 12वी /
पदवी /पदवीका परिक्षेमध्ये 60 % पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे.
अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही
मर्यादा 50% असेल.
या योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित
जाती व नवबौध्द प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर (इयत्ता 11 वी, पदवी, पदव्युत्तर पदवी)
शिक्षण घेण्यासाठी शासकीय वसतीगृहात प्रवेशित नसणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक
खर्चासाठी खालीलप्रमाणे रक्कम संबंधीत विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बॅक
खात्यामध्ये वितरीत करण्यात येईल.
अ.क्र.
|
खर्चाची
बाब
|
मुंबई शहर,
मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपुर या ठिकाणी उच्च
शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यासाठी अनुज्ञेय रक्कम
|
इतर महसुल
विभागीय शहरातील व उर्वरित "क" वर्ग महानगरपालिका क्षेत्रातील उच्च
शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यासाठी अनुज्ञेय रक्कम
|
उर्वरित
ठिकाणी उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यासाठी अनुज्ञेय रक्कम
|
1
|
भोजन
भत्ता
|
32000
|
28000
|
25000
|
2
|
निवास
भत्ता
|
20000
|
15000
|
12000
|
3
|
निर्वाह
भत्ता
|
8000
|
8000
|
6000
|
एकुण
|
60000
|
51000
|
43000
|
|
टिप:- वरील
रकमेव्यतिरिक्तवैद्यकिय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष
रु.5000/- व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष रु.2000/- इतकी रक्कम
शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येईल.
|
||||
·
सदर
योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष, अटी व शर्ती या अर्जासोबत जोडलेल्या आहेत. त्याचे विद्यार्थी व पालकांनी अवलोकन
करावे. निकष, अटी व शर्ती पुर्ण करणा-या
विद्यार्थ्यांनीच अर्ज भरावेत. या
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा विहीत नमुना खालील संकेतस्थळावर उपलब्ध करून
देण्यात आलेला आहे.
संकेतस्थळ: https://mahaeschol.maharashtra.gov.in
https://sjsa.maharashtra.gov.in
https://www.maharashtra.gov.in
·
तोसंकेतस्थळावरून
डाऊनलोड करून घ्यावा आणि अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या यादीसह तो विद्यार्थ्याचे
जातीचे प्रमाणपत्र ज्या जिल्हयातुन काढलेले आहे त्या जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त,
समाज कल्याण कार्यालयामध्ये समक्ष / टपालाद्वारे / कार्यालयाच्या ई-मेल वर दिनांक
16 मार्च 2017 पर्यंत दाखल करावा. अधिक माहितीसाठी संबंधीत जिल्ह्याचे सहाय्यक
आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.
जिल्हा कार्यालयाचा पत्रव्यवहाराचा
पत्ता, दुरध्वनि, ई-मेल दर्शविणारी यादी सोबत जोडलेली आहे.
·
अपुर्ण
भरलेले अर्ज आणी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे नसलेले अर्ज रद्द समजण्यात येतील.
·
60% पेक्षा कमी गुण असलेल्या
विद्यार्थ्यांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही
मर्यादा 50% असेल.
·
जिल्हा
निहाय अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात किती विद्यार्थ्यांना हा लाभ
द्यावयाचा ही संख्या निश्चित केलेली असुन त्यापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास
गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल.
·
निवडयादी
संबंधीत जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयामार्फत प्रसिध्द केली
जाईल. निवड न झालेल्या विद्यार्थ्यांना
वेगळे कळविण्यात येणार नाही.
·
सदर अर्ज
भरण्याची अखेरची मुदत 16 मार्च 2017 पर्यंत असेल.
Post a Comment